: सामाजिक न्याय भवन येथे उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस वाहतुक नियंत्रण शाखेच्या वतीने वाहतुक सुरक्षा अभियानाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली,सहायक उप प्रादेशिक परिवहन विजय तिराणकर, पोलीस वाहतूक नियंत्रण शाखा अधिकारी यांची उपस्थिती होती. पुर्वीच्या काळात आजारांनी मृत्यु होण्याचे प्रमाण जास्त होते. परंतु आजच्या काळात अपघाताने मृत्यु होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जगात सर्वात जास्त अपघाताने मुत्यु होण्याचे प्रमाण भारतात आहे. यासाठी भारत सरकारने वाहतुकीच्या नविन कायदयासोबतच दंड व शिक्षेत सुध्दा वाढ केली आहे. या कायदयातील नियमांचे पालन करुन नागरिकांनी वाहन चालवावे. आपल्यासोबतच दस-याच्या जीवाचा सुध्दा विचार करावा असे खासदार रामदास तडस म्हणाले. परिवार हा आयुष्याचा केद्र बिंद आहे आपली एक चुक दुस-यांच्या मृत्युस कारणीभूत ठरते. विदर्भाच्या महामार्गाच्या तुलनेत सर्वात जास्त महामार्गाची कामे वर्धा जिल्हयात सुरु आहे. अपघाताचे प्रमाण महामार्गावरील गावाच्या ठिकाणी होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे महामार्गालगतच्या गावातील नागरिकांनी रस्ता ओलांडतांना तसेच वाहन चालवतांना काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले आहे. दरवर्षी अपघाताचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी करण्याच्या भारत सरकारचे लक्ष आहे. मागील वर्षीच्या तुलनेत वर्धा जिल्हयात यावर्षी ६ टक्के अपघात कमी झाले आहे. हेल्मेट न वापरणे, सिट बेल्ट न लावता वाहन चालवणे, मदयप्राशन करुन वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वाहतुक करणे व वाहन वेगाने चालवणे. या बाबी अपघातास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्ष नागरिक व कुंटूंबाचे आपल्याप्रती काही देणे आहे हे समजून वाहतुकीच्या नियमाचे पालन करुन वाहने चालवावीत असे आवाहन पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांनी केले. यावेळी मान्यवरांचे हस्ते रस्ता सुरक्षा मार्गदर्शकिचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाला विद्याथी, विद्यार्थीनी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
रस्ता सुरक्षा सप्ताहचे उदघाटन